Headlines

मनीषा गोवेकर यांना ‘इंडिया प्राईम नॅशनल सोशल अवॉर्ड’ प्रदान

सावंतवाडी ता.०४-:* धाकोरा येथील रहिवासी तथा पंचायत समितीच्या सदस्य मनीषा विठ्ठल गोवेकर यांना त्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ‘इंडिया प्राईम नॅशनल सोशल अवॉर्ड’ देऊन गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पणजी येथे संपन्न झालेल्या ग्लोबल टुरिझम समिट अँड अवॉर्ड कार्यक्रमात मनीषा गोवेकर यांना ‘ इंडिया प्राईम नॅशनल सोशल अवॉर्ड’ या मानाच्या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मनीषा गोवेकर यांचं कोविड काळातही उल्लेखनीय योगदान-

सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्यपद भूषविणाऱ्या मनीषा गोवेकर या सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कोरोना काळातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या मालकीच्या शिरोडा येथील माऊली मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा पुरविली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी कोरोना काळात उपासमार असलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हातभारही लावला आहे. महिलांना एकत्रित करत त्यांनी धाकोरा पंचक्रोशीत महिला सक्षमीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच कोकणची लोककला दशावताराची सेवा करण्यासाठी खास महिलांना एकत्रित करून दशावतारी प्रयोगाचेही सादरीकरण त्यांनी केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्या गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने आर्थिक मदत करीत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ग्लोबल टुरिझम समिट अँड अवॉर्ड कार्यक्रमात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत पडते यांच्या शुभहस्ते ‘ इंडिया प्राईम नॅशनल सोशल अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले. मनीषा गोवेकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून विशेष अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page