मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने समाजसेवकांचा केलेला सत्कार त्यांना आणखी काम करण्याची नवी उमेद देईल…

अध्यक्ष आपा चव्हाण यांचे प्रतिपादन…

मालवण दि प्रतिनिधी ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो या निरपेक्ष भावनेने समाजात काम करणारी बरीच मंडळी ही प्रसिद्धीपासून दूर असतात किंबहुना त्यांचे कार्य लोकांसमोर येत नाही. अशा समाजाभिमुख काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांच्या कामांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच मालवणची मातृत्व आधार फाउंडेशन ही संस्था काम करत आहे.

आज मातृत्व आधार फाउंडेशनने मातृत्वाच्या मायेने केलेला हा सत्कार सत्कारमूर्ती समाजसेवकांना निश्चितच पुढील काळात आणखी काम करण्याची नवी उमेद देईल असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशन मालवणचे अध्यक्ष श्री. आपा चव्हाण यांनी येथे बोलताना केले. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे औचित्य साधून मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण या सामाजिक संस्थेचे वतीने वायरी येथील लोकनेते आर. जी चव्हाण सभागृह वायरी येथे, मालवणातील कॅन्सरग्रस्त तरूणाला आर्थिक मदत व प्राणी मित्र, पर्यावरण प्रेमी स्वच्छता दूत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बैल झुंज प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या प्राणी मित्र संस्थेचे सदस्य श्री. हार्दिक कदम , प्राणी मित्र म्हणून सेवा देणारे कासव मित्र जगदीश तोडणकर, प्रफुल्ल मांजरेकर, सौ.रिचेल तसेच पर्यावरण प्रेमी, स्वच्छता दुत म्हणून कु. स्वाती पारकर, कु. दीक्षा लुडबे, मेघल डिसोझा अशा एकूण आठ जणांचा शाल, श्रीफळ, सन्मान पत्र व स्मृती चषक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच सोमवार पेठ मालवण येथील वीस वर्षीय तरुण श्री. अनिरुद्ध भिडवलकर याला मातृत्व आधार फाउंडेशनच्यावतीने ११ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत तिच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आली . यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. संतोष लुडबे, अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण, संचालक दादा वेंगुर्लेकर, विश्वास गावकर, राजन कुमठेकर, संतोष नागवेकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई , सौ. श्रमिका संतोष लुडबे, संदीप लुडबे, प्रफुल्ल दयाळ लुडबे, सौ. गांवकर , सौ. हडकर, आनंद बांबार्डेकर ‘सर्प मित्र, श्री . संतोष सावंत, सुरेश बापार्डेकर, विनायक भिडवलकर, संदीप नेवाळकर संतोष दांडकर, रोहन चिंदरकर, संजय हंजणकर, चंदू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोष लुडबे, हार्दिक कदम, आनंद बांबर्डेकर यांची समयोचित भाषणे झाली प्रारंभी प्रभुदास आजगावकर यांनी प्रास्ताविक केले तर विनोद सातार्डेकर यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page