नांदगाव सोसायटी निवडणूकीत १३ जागांसाठी ४० अर्ज दाखल

कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव गृप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नियोजित निवडणूक ठरलेल्या 13 एप्रिल रोजी होणार असल्याचे दिसून येते आहे.एकूण 1016 पैकी 870 सभासद मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 146 सभासद मतदार हे अपात्र ठरविण्यात आले आहे.

एकूण १३ जागांसाठी ४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात रथी महारथीनी सुध्दा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांक म्हणजे आज मंगळवार दिनांक ५ एप्रिल रोजी निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक झाली तर संपूर्ण सोसायटी निवडणूक ही पहिलीच होणार असल्याने नांदगाव दशक्रोशितील नागरिक व सोसायटी सभासद यांचे लक्ष लागले आहे.

यात नांदगाव गावाबरोबरच ओटव, माईण, सावडाव, तोंडवली, बावशी या गावांचाही या सोसायटीत समावेश आहे. सदर सोसायटी स्थापन झाल्यापासून निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र 2012 साली झालेल्या सोसायटी निवडणूकीत बाकी सर्व जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र एका बिगर कर्जदार गटांतील एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया झाली होती. यानंतर गेल्या पाच वर्षांच्या मागे संपूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडली होती.

You cannot copy content of this page