धान्य वितरण करण्यासाठी ई पॉस मशीनवर येणाऱ्या अडचणी दूर करा…

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड-प्रतिनिधी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ,पुणे यांच्यावतीने संपुर्ण राज्यात ई-पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडीअडचणी दुर करणे,राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये माहे डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन वितरीत होऊ न शकलेला धान्य साठा माहे मार्च 2022 मध्ये ई-पॉस मधीनवर वितरणासाठी उपलब्ध करुन मिळणेबाबत व सर्वच जिल्हयामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट अंतर्गत कामकाजाचा आढावा घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निवेदन देवगड तहसिलदार यांच्याविभागामार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात आले.

या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच संपुर्ण देशातच आधार सर्वरला सतत येत असलेल्या तांत्रिक समस्येमुळे तसेच आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एन.आय.सी नवी दिल्ली आणि हैदराबार येथील सर्वरवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागील सात- आठ दिवसापासून राज्यातील अनेक पॉस मशिन व्दारे होणारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी पर्यंत नियमित व मोफत् धान्य वितरणाची टक्केवारी पाहता अजून 50 टक्के वितरण देखील पूर्ण झालेले नाही तसेच राज्यातील बहुतेक सर्वच जिल्हयांमध्ये माहे डिसेंबर 2021 पासून सप्लाय चेन मॅनेजमेंट अंतर्गत धान्य वितरणाचे संपूर्ण वेळापत्रक विस्कटलेले आहे.

पॉस मशीनवर येत असलेल्या तांत्रिक समस्यांमुळे दुकानामध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा उपलबध असून देखील धान्य वितरण करणे शक्य होत नाही. ज्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये पॉस मशीनवर धान्य उपलब्ध नाही याउलट ज्या दुकानांच्या मशीनवर धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा पोहोच झालेलाच नाही यामुळे धान्य वितरण थांबलेले असून शिधापत्रिकाधारकांमध्ये रेशन दुकानदारां विरोधात रोष आणि असंतोष वाढत आहे. यातूनच नांदेड शहरातील रास्तभाव धान्य दुकान क्रमांक 110 खुदवई नगर येथे सतप्त शिधापत्रिका धारकांनी रास्तभाव धान्य दुकानदार परवानाधाक यांच्या पतींवर दगडफेक केलेली आहे हि चिंताजनक बाब आहे. माहे डिसेंबर 2021 पासून राज्यातील बहुतांश जिल्हातील वाहतूक कंत्राटांची नव्याने नियुक्ती करत असताना करारनामा वेळेत न होणे, वाहतुक कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने दुस-या टप्यातील वाहतुकीसाठी उपलब्ध न करणे , हमाल आणि वाहतुक कंत्राटदार यांच्यामधील परस्पद समन्वयाचा अभाव यामुळे काहि जिल्हयात हमालांनी पुकारलेला संपक, एफ.सी.आ, बेस डेपो मधून तालुकास्तरीय धान्य गोदामांना पहिल्या टप्यातील धान्यसाठा व एस.सी.एम.एस. प्रणालीवर ऑनलाईन धान्यसाठा उपलब्ध न होणे, सी.एम.आर तांदूळ मंजूर असलेल्या जिल्हयांना नियतन महिन्यात सदरचा तांदूळ वेळेत पोहोच न होणे.

महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये बेस डेपो मधून थेट वाहतुकीचे नियोजन पूर्ण न् झाल्यामुळे तसेच मुदत संपल्याने कालबाहय झालेल्या ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नाही. पॉस मशीनला सततच्या येणा-या तांत्रिक समस्यांमुळे धान्याचे ऑनलाईन वितरण वेळेत आणि मुदत वाढीनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही.एकंदरीत वरील सर्व कारणांमुळे आपणाकडे विनंती करण्यात येते की वरील तांत्रिक समस्यांमुळे राज्यातील विविध ठिकाणी धान्याचे ऑनलाईन वितरण वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाही. यास्तव माहे डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन वितरीत होऊ न शकलेले नियमीत व मोफत धान्य वितरणासाठी 31 मार्च 2022 पर्यंत कॅरी फॉरवर्ड स्वरुपात ई- पॉस मशीरवर उपलब्ध करुन देण्यात यावे यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यांतील वादाचे प्रसंगी कमी होण्यास मदत होईल. तसेच सल्पाय चेन मॅनेजमेंट प्रणाली संदर्भातील दिनांक 18 मे 2018 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भात मा. प्रधान सचिव महोदयामार्फत स्वत वैयक्तिक लक्ष घालून संपुर्ण राज्यात जिल्हानिहाय आढावा घेउुन स्थानिक आणि तांत्रिक अडचणीं दुर करुन घ्याव्यात आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणा-या दोषिंवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा 1 एप्रिल 2022 पासून राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांकडून आंदोलनात्मक भूमिका घेवून ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील यांची नोंद घ्यावी असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. फोटो-निवेदन देतेवेळी तालुक्यातील अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक आदी.

You cannot copy content of this page