ज्येष्ठ उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ …
देवगड ता.०२-: चैत्र शुद्ध पाडवा अर्थातच गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रा देवगड व जामसंडे शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ च्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रा शुभारंभ देवगड किल्ला मारुती मंदिर येथून श्रीफळ फोडून जेष्ठ उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम,नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी सुरेश सोनटक्के ,विलास रुमडे,सुधीर मांजरेकर,शिवप्रसाद पेडणेकर अनिल खडपकर,प्रदीप सावंत ,किल्ला ग्रामस्थ मंडळाचे सूर्यकांत पाळेकर,महेश नेसवणकर,गुरुनाथ वाडेकर या शोभायात्रेत देवगड किल्ला,देवगड बाजारपेठ,देवगड उमा मिलिंद पवार,प्रजापती ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय केळकर हायस्कुल वाडा विद्यार्थिनी गुजराथी गरबा रास या सर्वांनी सहभाग घेऊन आकर्षक लेझिम नृत्य,तसेच आकर्षक वेशभूषा,देखावे सादर करून शोभायात्रेत रंगत आणली होती.
जामसंडे येथे शोभायात्रा जामसंडे शहर व्यापारी मंडळ,महिला व्यापारी यांचे वतीने जामसंडे सांस्कृतिक भवन ते दिर्बादेवी रामेश्वर मंदिर जामसंडे या मार्गावरही ढोल ताशे टाळ, झान्ज पथक सह शोभायात्रा काढण्यात आली .यात प्रामुख्याने देवगड जामसंडे नगराध्यक्षा तसेच अन्य नगरसेवक हे जामसंडे येथील शोभयात्रेत सहभागी असल्याचे प्रकर्षाने दिसून आले तर नगरसेविका प्रणाली माने या देवगड शोभायात्रेत सक्रिय होत्या तर नगरसेवक निवृत्ती ( बुवा) तारी हे शोभायात्रा शुभारंभ सोहळ्यास उपस्थित होते.दरम्यान देवगड येथील शोभायात्रा सांगता सोहळ्यास नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. देवगड जामसंडे शोभायात्रा यशस्वी होण्याकरिता पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
