वेंगुर्ले येथे “भव्य स्वागत यात्रे”ने नविन वर्षाला प्रारंभ…

हिंदू तेजा जाग रे…भारत माता कि जय..अशा घोषाणानि परिसर दुमदुमला

वेंगुर्ला ता.०२-:* स्त्री-पुरुषांची पारंपारिक वेशभूषा, भगवे झेंडे यासह ढोलताशांच्या गजरात वेंगुर्ला शहरात आज भव्य स्वागतयात्रा काढून हिदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.हिंदू तेजा जाग रे…भारत माता कि जय..अशा विविध घोषाणानि परिसर दुमदुमला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू धर्माभिमानी मंडळी यांनी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रेचे आयोजन केले होते.

या यात्रेत शेकडो हिदू धर्माभिमानी सहभागी झाले होते. नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगाराई नष्ट होवो यासाठी प्रारंभी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर या स्वागतयात्रेला सुरुवात झाली. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा, जुना एसटी स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे यात्रेची सांगता झाली.

या स्वागतयात्रेत सिंधुरत्न ढोल पथक यांचे खास आकर्षण ठरले. तर चांदेरकर महाराज भक्तमंडळी सहभागी झाले होते. तर स्त्री पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा साकारली होती.लहान मुलांनी विविध पुराणावर आधारीत वेशभूषा साकारुन आपलीही उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वांनी एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोओळी – नववर्षाच्या स्वागतासाठी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रा काढण्यात आली.

You cannot copy content of this page