आजच्या शुभ दिनी कार्यक्रम आयोजित करणे कौतुकास्पद…

संजू परब; समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा करण्यात आला सत्कार…

सावंतवाडी ता.०२-:* आजच्या शुभ दिवसात असा कार्यक्रम घेणे खरोखरच कौतुकास्पद असून, हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अजय गोंदावळे व उमाकांत वारंग यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. अशा शब्दस्तुतीसुमनाने नगराध्यक्ष संजू परब यांनी दोघांचेही कौतुक केले आहे. ते भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय नृत्य कार्यक्रम प्रसंगी श्री.संजू परब बोलत होते. यावेळी समजात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

You cannot copy content of this page