कणकवलीत ९ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर

कणकवली ता.०२-:* अथायु हॉस्पीटल कोल्हापूर यांच्यावतीने ९ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे, या शिबीरामध्ये मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी करण्यात येणार आहे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे मुतखडा, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया मोफत केले जाणार आहे कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपयेची अँजिओग्राफी मोफत केली जाणार असून शिबीरामध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे, अशा पेशंटना हॉस्पिटलकडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे.

शिबिरास येताना आपले ओरिजनल रेशन कार्ड ,आधार कार्ड व सर्व जुने रिपोर्टस घेऊन येणे.हॉटेल रॉयल सिटी इन हॉल, प्रांत ऑफिस जवळ कणकवली मध्ये सकाळी ११ ते दुपारी २ ह्या वेळेत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार असून शिबीर सहभागी नाव नोंदणी साठी महेंद्र सावंत ९४२०३३५७५८, महेश तेली 8530606748, निलेश मालंडकर 9420309400 ह्यांना संपर्क करावा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक महेंद्र सावंत यांनी केला आहे

You cannot copy content of this page