वेंगुर्ला प्रतिनिधी-: सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला तालुक्यातही घरोघरी गुढी उभारुन मराठी नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिदू नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी प्रत्येकजण आपल्या दारात गुढी उभारुन नविन वर्षाचे स्वागत करतो. गेले दोन वर्षे या सणावर कोरोनाचे सावट होते.
मात्र यावर्षी हे साटव दूर झाल्याने मोठ्या उत्साहात घरोघरी गुढीचे पूजन करण्यात आले. सकाळपासून ते दुपारपर्यंत या ठिकठिकाणी गुढी उभारण्याचे काम सुरु होते. विविध वस्त्र परिधान केलेल्या उंचच उंच गुढ्या लक्ष वेधून घेत होत्या. तर काही घरांमध्ये नूतन पंचांग वाचनही करण्यात आले.
