सावंतवाडीत मनसेतर्फे गुढीपाडव्यानिमित्त जिलेबीचे वाटप

आशिष सुभेदार, आकाश परब यांचा पुढाकार

सावंतवाडी ता.०२-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून तसेच शहर सचिव आकाश परब यांच्या पुढाकारातून एसटी स्टँड परिसरात तसेच अंकुर महिला आश्रम येथे मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधून जिलेबीचे वाटप करण्यात आले.

यावेळी शहर सचिव आकाश परब संदेश शेट्ये मंदार सुभेदार सिद्धेश वंजारी गोविंद सोनी गेब्रियल फुङताङो आदी उपस्थित होते मराठी सण, मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे मनसे पक्षाचे प्रमुख ध्येय आहे.राज साहेबांनी पक्षाची स्थापना ही मराठी जनतेच्या न्याय हक्कांसाठी केला.

महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.त्यामुळे यापुढील काळात आम्ही मराठी सण अत्यंत उत्साहाने साजरा करणार असल्याचे मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page