डॉ जयेंद्र परुळेकर आजोबांचा इतिहास पुढे चालवीत आहेत

आ दीपक केसरकर;परुळेकर हॉस्पिटल उदघाटन प्रसंगी जागवल्या भाऊ परुळेकर यांच्या आठवणी

सावंतवाडी ता.०२-:* जयेंद्र परुळेकरांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आजोबांपासून चा इतिहास असून तो वारसा जयेंद्र परुळेकर व त्यांच्या पत्नी चालवत आहेत. भाऊ परुळेकर यांना अजूनही सावंतवाडीतील लोक विसरलेली नाहीत त्यानुसार एका अर्थाने भाऊंची आठवण जिवंत ठेवत असताना आपल्या हॉस्पिटलचे रूपांतर ते एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करत आहे हे अभिमानास्पद आहे कोणत्या हॉस्पिटलहे डॉक्टरच्या स्किल वर चालत असत आणि त्यांनी प्राप्त केलेल्या स्कील हे येथील लोकांना मिळेल असे पहिले मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल सावंतवाडीत होत आहे तसेच सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे मात्र निधी मंजूर असणे आणि प्रत्यक्षात यामध्ये फरक असतो त्या दृष्टीने परूळेकर यांनी जी स्किल पुण्यात घेतली आहे ती सावंतवाडीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वी, मेडिकल कॉलेजमध्ये सर्व सुविधा पूर्ण होण्यापूर्वी आपल्या स्किल च्या माध्यमातून सुविधा सावंतवाडीत आणल्या हे जयेंद्र परुळेकर यांचे मोठे काम असल्याचे केसरकर म्हणाले.येथील आनंद पॉलीक्लिनिक आणि कै. डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आणि आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी श्री. आमदार दिपक केसरकर बोलत होते.

यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ शहर प्रमुख बाबू कुडतरकर माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर युवा नेता अमय तेंडुलकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page