टेस्ट ट्यूब बेबी सारखी सुविधा जिल्ह्यात सुरू झाल्याने अनेक कुटुंबाचे प्रश्न सुटतील…

विनायक राऊत; कै. डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम मध्ये नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ

सावंतवाडी ता.०२-:* डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जनतेसाठी टेस्ट ट्यूब बेबी सारखी चांगली आरोग्य सुविधा आजपासून सावंतवाडीत सुरू होत आहे. अनेक कुटुंबांना बाळ होत नसल्याने त्यांना निराशेचा सामना करावा लागत होता. तसेच ही आरोग्य सुविधा मोठ मोठ्या शहरात असल्याने आर्थिक प्रश्न उपस्थित राहत होता. त्यामुळे अनेक कुटुंब या टेक्नॉलॉजी पासून वंचित राहत होती. ही सुविधा आता सावंतवाडीत उपलब्ध होणार असल्याने अनेक कुटुंबाचे प्रश्न सुटणार आहेत. असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ते पुढे म्हणाले की, या टेक्नॉलॉजीचे सुविधा देणारे डॉक्टर महाबळ, डॉ. आंबापूरकर यांच्या अनुभवाचा उपयोग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ला होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

येथील आनंद पॉलीक्लिनिक आणि कै. डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आणि आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी श्री. खासदार विनायक राऊत बोलत होते.

यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ शहर प्रमुख बाबू कुडतरकर माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर युवा नेता अमय तेंडुलकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page