नागरिकांनी घ्यावी नोंद; अजय गोंदावळे आणि उमाकांत वारंग यांचे आव्हान
सावंतवाडी ता.३१-:* भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाच्या सभागृहाच्या ठिकाणात काही कारणास्तव बदल करण्यात आला असून हा कार्यक्रम आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात उद्या होणार आहे तरी शहरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन कलानिकेतन चे उपाध्यक्ष उमाकांत वारंग, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कथकनृत्य पंडित बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उद्या दिनांक २ एप्रिल रोजी आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात उद्या होणार आहे याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव व सत्कार देखील करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या कार्यक्रमाला माजी आमदार राजन तेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक सदस्य रवींद्र मडगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कलानिकेतन चे उपाध्यक्ष उमाकांत वारंग, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आणि कलानिकेतनच्या शास्त्रीय कथक नृत्य शिक्षिका प्रीती डिसोजा यांनी केले आहे.
