भरपाईसाठी नौका मालकांचे समुद्रात उपोषण

तौक्तेचा तडाखा : प्रशासनाला ६ एप्रिलपर्यत डेडलाईन

देवगड ता.०१-:* तौक्ते चक्री वादळात तीन नौका फुटून प्रत्येकी ३०ते ३५लाखांचे नुकसान झाले .त्या नुकसानीच्या पंचनाम्या प्रमाणे तिन्ही नौका मालकांना नुकसान भरपाई मिळावी .व या संदर्भात योग्य ती कार्यवाही येत्या ६ एप्रिल पर्यंत न झाल्यास ८ एप्रिल रोजी तिन्ही नुकसानग्रस्त नौका मालक आपल्या कुटूबीयां समवेत समुद्राच्या पाण्यात उतरून आमरण उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम तिन्ही नौका मालक व सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर यांनी देवगड पोलीस स्थानकात झालेल्या बैठकीत ठामपणे सांगितले.

या बैठकीला पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे,सहा.मत्स्यवसाय विकास अधिकारी र.ग.मालवणकर,मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर,सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण,गोपनीय महिला पोलीस नाईक विनिता भुजे, नौका मालक पांडुरंग कोयंडे, नीरज कोयंडे, रघुनाथ कोयंडे ,देवगड फिशरमेन्स चेअरमन द्विजकांत कोयंडे सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर,यांत्रिक नौका मालक संघाचे जगन्नाथ कोयंडे,उपस्थित होते. तौक्ते चक्री वादळात देवगड बंदरातील ३नौका फुटून त्या नौका पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या. यात त्या मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले होते व सुमारे ३०ते ३५ लाखाचे नुकसान झाले या घटनेत शासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही अथवा आर्थिक मदत न झाल्याने देवगड बंदरातील त्या तीन नौका मालकांनी समुद्रात उतरून कुटुंबीयांसमवेत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याच्या बाबतचे लेखी पत्र संबंधित विभागांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी शासन निर्णयानुसार भरपाईची रक्कम देण्यात आल्याचे सांगून नौकांचे पुनर्वसन करणे बाबत कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त विषयाबाबत चर्चा करण्याकरिता शुक्रवार दिनांक १एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता पोलीस स्थानक देवगड या ठिकाणी सहा .मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने पुनर्वसन,नुकसानभरपाई उपोषण या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली .व या चर्चेअंती येत्या ६ एप्रिल पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही नौका नुकसानभरपाई संदर्भात न झाल्यास येत्या ८ तारीखला समुद्राच्या पाण्यात उतरून आमरण उपोषण करण्याचे भूमिकेवर ठाम असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले..

You cannot copy content of this page