दुकान फोडी करणाऱ्या चोराच्या आवळल्या मुसक्या

देवगड पोलिसांची कारवाई;४ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी

देवगड ता.०१-:* देवगड शहरात मागील काही दिवसात अज्ञात चोरट्यांकडून करण्यात येणारी दुकान फोडी सत्र देवगड पोलिसांना आव्हान उभे राहिले होते.परंतु स्थानिक देवगड पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी राबविलेली तपास यंत्रणा व त्यामध्ये पाळलेली गुप्तता यामुळे अज्ञात चोरट्याचा छडा लावण्यात यश आले आहे.

देवगड पोलीस पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजन जाधव,पोलीस नाईक अमित हळदणकर यांनी संशयित आरोपीची माहिती काढीत गोवा येथून रेल्वेने मुंबई कडे पलायन करीत असताना या चोरट्याला शिताफीने कणकवली येथे ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करून देवगड येथे आणण्यात आले आहे.

आरोपी सापडल्याने व्यापारी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.हा आरोपी देवगड शहरातील किनारपट्टीवरील नजीकच्या वाडीतील असल्याचे समजते.यात अन्य आरोपींचा सहभाग आहे.

का?याचाही शोध देवगड पोलीस घेत आहेत. देवगड शहरातील दुकान फोडीचे सत्र सुरू झालेनंतर देवगड पोलिसांवर चहूबाजूने टीका होत होती श्वान पथक,ठसे तज्ञ याना पाचारण,स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनीही तपास सुरू ठेवला होता.त्यातच मोबाईल कॉल, सीसीटीव्ही फुटेज या द्वारे देवगड पोलिसांनी तपास सुरू ठेवला असताना अखेर दुकान फोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले.

या चोरट्याने चोरीचा गुन्हा मान्य केला असल्याचे समजते. संशयित चोरटा देवगड शहरातील खाडीकिनारी लगतच्या वाडीतील असल्याचेव निदर्शनास आले असून देवगड पोलिसांची ही कारवाई केल्याने व्यापारी,नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही मध्ये या चोरट्याचा चेहरा कैद झाला होता या चोरीचा तपास .

मोहीमेत जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी याचे मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,यांच्या नेतृत्वाखाली,पोलीस हवालदार राजन जाधव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलीस नाईक अमित हळदणकर, आशिष नाईक,पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोबरे,यांनी कामगिरी पार पाडली. दरम्यान देवगड येथील न्याल्यालयासमोर या घटनेतील संशयित आरोपीला आकाश मुंकुंद कोयंडे याला हजर केले असता देवगड न्यायालयाने ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page