देवगड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले सापडली

देवगड ता.०१-:* देवगड समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकच्या वेळी ऑलिव्ह रिडले काही कासवाची पिल्ले किरण पांचाळ, अमित गोळवणकर व सुवर्णा देवगडकर यांच्या दृष्टीस पडली. हि पिल्ले मागील २ ते ३ दिवसांपासून काही स्थानिकांच्या दृष्टीस पडत होती. परंतु त्यांच्या घरट्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सापडत नव्हती. तसेच घरट्यातून बाहेर आलेली पिल्ले कावळे आणि कुत्रे यांच्या भक्षस्थानी पडताना त्यांनी पहिले.

बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनंतर बाहेर आलेल्या पिल्लांच्या ठश्यांचा मागोवा घेता घेता कासवाचे घरटे सापडले. हळुवारपणे या खड्यामधील वाळू बाजूला करत असताना कासवाची पिल्ले सापडायला लागली. काही पिल्ले नुकतीच अंड्यातून बाहेर पडत होती.या पिललांना हळुवारपणे बाहेर काढून एका टब मध्ये ठेवण्यात आले. हि कासवाची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यास सतीश देवगडकर, सुरज देवगडकर,अजित टाककर, विकी देवगडकर, विनोद देवगडकर, विनोद सावंत, केदार बिडये,अर्णव कांबळे, भालचंद्र पारकर या स्थानिकांनी मदत केली.

You cannot copy content of this page