सावंतवाडी-: बांदा येथील नट वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या शालेय निबंध स्पर्धेत माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी गायत्री विवेकानंद केसरकर हिने द्वितीय क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. गायत्री केसरकरच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थाध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, मुख्याध्यापिका माधवी सावंत, शालेय समिती यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
गायत्री केसरकरचे शालेय निबंध स्पर्धेत यश
