युवकांसह लहान मुलांनी केली रंगांची उधळण;पाडव्याच्या पुर्व संध्येला शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता
वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला शहरात आज धुळवडीच्या पार्श्वभूमीवर युवकांसह लहान मुलांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात विविध रंगांची उधळण पहायला मिळत होती.
वेंगुर्ल्याच्या शिमगोत्सवाची सांगता धुळवडीने पाडव्याच्या आदल्या दिवशी होते. यावर्षी हा शिमगोत्सव १६ दिवसांचा होता. आज धुळवडी दिवशी दुपारनंतर ठिकठिकाणी लहान मुले व युवक यांनी रस्त्यावर एकत्र येत एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे ही रंगपंचमी साजरी करताना नियम घातले होते. यावर्षी नियमांचे बंधन नसल्याने अगदी उत्साहात ही रंगपंचमी साजरी करण्यात आली. सायंकाळपर्यंत हा रंगपंचमीचा कार्यक्रम सुरु होता. फोटोओळी – भुजनागवाडी येथील मुले व तरुणांनी एकत्र येत रंगपंचमी साजरी केली.
