तसे झाल्यास भाजप आंदोलन छेडेल माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांचा इशारा
देवगड ता.०१-:* देवगड शहरातील दुकानफोडी प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला काही राजकीय नेते वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ही बाब व्यापारी वर्गाच्या दृष्टीने योग्य नाही .त्याला वाचविण्याचा कोणत्या पक्षाच्या नेत्यांने अथवा कार्यकर्त्याने प्रयत्न केला.तर भाजपचे आम.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देवगड जामसंडे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
या वेळी देवगड भाजप तालुका सरचिटणीस शरद ठुकरूल,माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील,उपस्थित होते. या पुढे बोलताना श्री चांदोस्कर म्हणाले,कोरोनाचे काळात व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या आर्थिक संकटात सापडला त्यानंतर व्यापार हळूहळू सुरू झालेवर दुकानफोडीचे सत्र सुरू झाले व व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे..देवगड पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश प्राप्त केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असताना राजकीय पदाधिकारी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी चोरट्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.या पूर्वी कणकवली मध्ये असे दुकानफोडी चोरीचे प्रमाण वाढले होते.तेच प्रकार देवगड शहरात वाढले आहे.त्यामुळे कणकवली पॅटर्न देवगड मध्ये राबविला जात आहे का?अशी विचारणाही चांदोस्कर यांनी करून अशा चोरट्यांना राजकीय पदाधिकारी यांनी पाठीशी घालू नये अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी आवर्जून सांगितले. फोटो -देवगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना योगेश चांदोस्कर
