सावंतवाडीतील परुळेकर नर्सिंग होममध्ये नव्या रूग्णसेवेचा शुभारंभ

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

उपस्थित राहण्याचे डॉ.जयेंद्र परुळेकर आणि डॉ.लीना परुळेकर यांचे आवाहन

सावंतवाडी ता.३१-:* येथील आनंद पॉलीक्लिनिक आणि कै. डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ करण्यात येत असून, यामध्ये मेंदू विकार तज्ञ डॉ. मुकुंद अंबापूरकर, स्त्री रोग तज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. मृदुला महाबळ अंबापुरकर, कन्सल्टंट एंडोक्रोईनोलॉजिस्ट डॉ. मनीष कुशे या ४ अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा शुभारंभ खासदार विनायक राऊत आणि आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यावेळी या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. जयेंद्र परुळेकर व डॉ. लीना परुळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page