डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वेंगुर्ला अध्यक्ष पदी अमोल जाधव

तर उपाध्यक्ष पदी मधुकर जाधव यांची निवड

वेंगुर्ला ता.३०-:* डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची सभा दि. १७ मार्च २०२२ रोजी आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे जयंती उत्सव समिती माजी अध्यक्ष आयु गौतम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी माजी सचिव आयु. हर्षल जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले.या नंतर सन- २०२२ ते २०२३ या वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आनंदवाडी वेंगुर्ला अध्यक्ष आयु.अमोल जाधव,उपाध्यक्ष आयु.मधुकर जाधव,आयुनि.सुहानी जाधव,सचिव आयु.आदेश जाधव सहसचिव आयु. तेजस जाधव,खजिनदार,आयु. जयंत जाधव, सहखजिनदार आयु. महेंद्र जाधव,कार्याध्यक्ष आयु. विठ्ठल जाधव तर सल्लागार पदी आयु. वाय जी कदम,गजानन जाधव ,सुभाष जाधव,सखाराम जाधव,वामन कांबळे,व इतर बाकी सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली.

या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ची रुपरेषा ठरवण्यात आली, यावेळी दलित समाजसेवा मंडळ अध्यक्ष आयु सुहास जाधव,सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्ष आयुनि संयोगीता जाधव तसेच आनंदवाडीतील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नवनिर्वाचित अध्यक्ष आयु.अमोल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच सर्वांचे सहकार्य असेच मिळेल असे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

You cannot copy content of this page