कणकवलीतील मांडावर सोंगांच्या माध्यमातून समाजप्रबोधन

महापुरुष मित्रमंडळाच्या ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली ता.३०-:* कणकवली असल्ल मालवणी क्रिएशन संघाने ‘ बाबलो झालो आमदार ‘ या थिमवर कॉमेडी स्किट सादर करून राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.झिरो बजेट प्रोडक्शन या संघाने ‘ गोंधळ ‘ या थिमीवर सामाजिक गोंधळावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन करत रसिकांची मने जिंकली.या ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कै.सुरेश अनंत धडाम स्मृति महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ आयोजित झेंडा चौकातील मांडावर हास्यकल्लोळ स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ जेष्ठ नागरिक दत्ता सापळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रविण पारकर,जेष्ठ नागरिक शरद पारकर,बाळा सापळे,दिलीप पारकर,विजय पारकर,नाथा अंधारी,चंदू सापळे,अनिल मुंज,मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी,उपाध्यक्ष राजू पारकर,खजिनदार मंदार सापळे,उद्योजक निलेश धडाम, राजेश सापळे,विलास कोरगावकर,राजू मानकर,उदय मुंज,आबा उचले,दिनेश नार्वेकर,हर्षल अंधारी,विकास काणेकर,प्रद्युम मुंज,सोहम वाळके,प्रज्वल वर्दम,चेतन अंधारी,यश अंधारी,वृषभ मेंनकुदळे,वृद्र सापळे,संदीप अंधारी,आकाश बिडये,आदी उपस्थित होते.या स्पर्धेत १४ संघानी सहभाग घेतला असून या स्पर्धेतील असल्ल मालवणी क्रिएशन संघाने ‘ बाबलो झालो आमदार या थिमीवर स्किट सादर करीत राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत रसिकांनी खखळून हसवले.या कॉमेडी स्किटमधून बाबलो नावाचे पात्र हे व्यसनाच्या आहारी गेलेले असते. आमदार होण्याच्या उद्देशाने हे पात्र व्यसन सोडून राजकीय क्षेत्रात उतरते आणि निवडणूक लढवत निवडून येतो.आमदार झाल्यानंतर कोणकोणत्या प्रश्नाला सामोरे जावे,याची वस्तुस्थिती कॉमेडी स्वरूपात सादर केली .या कॉमेडी प्रसंगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. झिरो बजेट प्रोडक्शन या संघाने ‘ गोंधळ ‘ या थिमीवर सादरीकरण करत सामाजिक गोंधळावर प्रकाश टाकला . सिद्धभराडी ,ओसरगाव व महापुरुष मित्रमंडळ,सोनवडे संघांनी पारंपरिक सोंगे सादर करून रसिकांची मने जिंकली या स्पर्धेचे परीक्षण सुहास वरुणकर,प्रा.हरिभाऊ भिसे,अभय खडपकर यांनी केले.तर सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. ३१ मार्च रोजी रात्रौ ९ वा.रंगखांब प्रस्तुत,’मांडावरील जल्लोष’ हा ३० कलाकाराच्या संचातील कॉमेडी कार्यक्रम सादर होणार असून रसिकप्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापुरुष , मित्रमंडळ,बाजारपेठच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page