पुंडलिक दळवी; विरोधकांना दिलाय सूचक इशारा
सावंतवाडी ता.२५-:* आजचा प्रवेश हा ट्रेलर असून, आगामी काळात विरोधकांना पिक्चर दिसणार असल्याचा इशारा देत आगामी काळात आणखी काही इतर पक्षांतील पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार असल्याचे सूचक विधान तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, काहीना असे वाटत आहे की, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडे उमेदवार नाही आहेत. परंतु, येणाऱ्या काळात सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन चेहरे दिसणार असून, राष्ट्रवादीची ताकद सर्वानाच दिसणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
