सुधीर आडिवरेकर; पंप बसवून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा...
सावंतवाडी ता.२५-:* सध्या जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरात सगळ्या प्रभागात पाणी योग्य प्रमाणात आणि मुबलक यावे अशी मागणी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, शहरात जास्त पाणी येण्यासाठी कोणी कुठे पंप बसवले असतील तर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
तसेच सध्या गरमीचे दिवस सुरू झाले असून त्यांनी लोकांना आता आणि कुठेही कमी पडता कामा नये त्यामुळे याबाबत आपण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य नियोजन प्रत्येक प्रभागाचे करावे असेही देखील त्यांनी यावेळी मागणी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग व माजी नगरसेवक उदय नाईक उपस्थित होते.
