आपल्या भवतालचे अनुभव पोचूनच चांगले लिहिता येते…

नांदगाव साहित्य समाज मेळाव्यात अजय कांडर यांचे प्रतिपादन

*💫कणकवली दि.१०-:* लिहित्या लेखक कवीला आपल्या भूमीची ओढ असायला हवी. आपल्या आजूबाजूच्या भोवतालचे अनुभव पचूनच चांगलं लिहिता येतं.कवी लेखकाला चांगले लिहायचे असेल तर त्याने आपल्या भूमीपासून दूर जाऊ नये. आपला गाव, आपला परिसर खोलवर मनात रुजलेला असतो. त्या संस्कारातून अधिक चांगले लिहिता येते. दुर्दैवाने लेखनाच्या प्रयोगशीलतेच्या हव्यासापोटी नव्या पिढीतील काही लेखक-कवी आपल्या भवतालाला पासून, आपल्या भूमीपासून दूर जाताना दिसत आहेत असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी नांदगाव येथे किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य मेळाव्यात केले. मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट वर्धापन दिनानिमित्त समाज साहित्य मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध साहित्यिकांच्या उपस्थितीत श्री कांडर यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या सभाग्रह आयोजित करण्यात आला.यावेळी बोलताना कांडर यांनी ऋषिकेश मोरजकर सारखे कार्यकर्ते तळमळीने साहित्यिक उपक्रम नांदगाव सारख्या छोट्या भागात आयोजित करत आहेत, यातूनच हा गाव सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध होणार आहे असे आग्रहाने सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण रेल्वेचे अधिकारी तथा समाज साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर मातोंडकर, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर तसेच कवयित्री मनीषा पाटील, प्रमिता तांबे, ट्रस्ट अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर , उपाध्यक्ष नारायण मोरये , वैद्यकीय अधिकारी डॉ . रावराणे, ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, पशुधन विकास अधिकारी डॉ कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य भाई मोरजकर, ट्रस्ट संचालिका सुमती मोरजकर ,सोसायटीचे सचिव अजय गोसावी आदी उपस्थित होते श्री मातोंडकर म्हणाले नांदगाव सारख्या ग्रामीण भागात किशोर मोरजकर ट्रस्ट सामाजिक-सांस्कृतिक काम करत आहे.ही महत्त्वाची गोष्ट आहे.गाव विकास करायचा असेल तर राजकारणा बरोबर सांस्कृतिक दृष्ट्या गावाचा विकास होणे गरजेचे असते. ऋषिकेश मोरजकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील महत्त्वाचे साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.गावचा सांस्कृतिक विकास होतो तेव्हाच त्या गावाला बौद्धिक चेहरा प्राप्त होत असतो. सौ वाळके म्हणाल्या,मोरजकर ट्रस्टचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.कारण या ट्रस्ट जवळ कोणत्याही प्रकारची आर्थिक पुंजी नसतानाही विविध सामाजिक-साहित्यिक उपक्रम हाती घेण्यात आले. यापुढील काळात या संस्थेच्या कार्यक्रमांना माझे पूर्णतः सहकार्य मिळेल. यावेळी सरपंच नावलेकर यांनी विचार व्यक्त केले. मोरजकर ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय काव्यलेखन, निबंध स्पर्धाचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले.तसेच यावेळी निमंत्रितांच्या कविसंमेलनात मधुकर मातोंडकर,रुपाली दळवी,मनीषा पाटील, सूरज यादव, प्रमिता तांबे,सागर कदम, मृणाल पिळणकर आदींनी आपल्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर यांनी तर सूत्रसंचालन प्रणिता तांबे यांनी केले.

You cannot copy content of this page