मेकॅनिकल रोड येथे २६ रोजी धार्मिक कार्यक्रम

मालवण ता.२२-:* मालवण येथील मेकॅनिकल रोड रहिवासी मित्रमंडळातर्फे मेकॅनिकल रोड येथे दि. २६ मार्च रोजी त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, रात्री बुवा नंदन म्हाडगूत (कट्टा), बुवा संकेत मेस्त्री (मालवण), बुवा मदन करलकर (भोगवे) यांचे भजन तसेच देव मोबारेश्वर संगीत वारकरी भजन मंडळ, देवबागचे वारकरी भजन सादर होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मेकॅनिकल रोड रहिवासी मित्रमंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page