मालवण ता.२२-:* मालवण येथील रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यापासून २ ते ४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. लघुरुद्र, ५ वा. नाना सामंत मित्रमंडळाचे भजन, सायंकाळी ६ वा. सातेरी भजन मंडळ, पावशीचे भजन (बुवा अरुण घाडी), रात्री ८ वा. देव मोबारेश्वर वारकरी भजन मंडळ, देवबागचे भजन, ३ रोजी सायंकाळी ५ वा. भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर खेळ पैठणीचा कार्यक्रम यात प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय सोन्याची नथ, तृतीय कुकर व सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
माहितीसाठी (९८२३९४२५१८) या क्रमांकावर संपर्क साधावा. ४ रोजी रात्री ९.३० वा. ‘पुष्पा’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे, तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
