नांदगाव रोड स्टेशनवर मांडवी, तुतारी व कोकणकन्या गाडयांना थांबा मिळवा

नाम .रावसाहेब दानवे यांची प्रमोद जठार व विशाल परब यांनी घेतली भेट

कणकवली ता.२२-: नांदगाव रोड स्टेशनवर मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या गाडयांना थांबा मिळण्यासाठी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार व युवा कार्यकर्ते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत निवेदन सादर केले व याबाबत लक्ष वेधले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली आणि वैभववाडी रोड या दोन स्थानकांदरम्यान नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येते. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या गावांमधील अनेक लोक नांदगाव रोड रेल्वे स्टेशन वरुन प्रवास करतात. तसेच कोल्हापूर, राधानगरी या भागातील लोक सुद्धा नांदगाव रोड रेल्वे स्टेशन वरुन यात्रा करतात. मात्र कोकण रेल्वेच्या नांदगाव रोड रेल्वे स्टेशन वर मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या गाड्यांना थांबा नसल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. सद्यस्थिती मध्ये कोकण रेल्वेची कोणतीही गाडी ही नांदगाव रोडवर ती थांबत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

याआधी नांदगाव रोड रेल्वे स्टेशन वर सर्व गाड्या थांबत असत. त्यामुळे अनेक स्थानिकांनी याठिकाणी आपले व्यवसाय सुरू केले होते. मात्र आता इथे एकही गाडी न थांबल्यामुळे अनेकांचे उद्योगधंदे हे बंद पडले आहेत. यासोबतच या स्टेशन वर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या अनेकांचा देखील व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या गाड्यांना नांदगाव रोड रेल्वे स्टेशन वर थांबा देण्यासाठी आणि प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी नांदगाव रोड स्टेशन वर कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या थांबणं हे गरजेच आहे. यासाठी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार तसेच भाजपाचे युवा कार्यकर्ते विशाल परब यांनी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये नांदगाव रोड रेल्वे स्टेशन वर कोकण रेल्वेच्या मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page