*सावंतवाडी ता.२२-:
डेरवण,चिपळुण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर उपविजेता ठरला.स्पर्धेत राज्यातील 81 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.मुक्ताई अॅकेडमीच्या 10 विदयार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.अॅकेडमीच्या सात विदयार्थ्यांनी पारीतोषिके मिळऊन दरवर्षीप्रमाणे आपला दबदबा कायम ठेवला.
पारीतोषिकप्राप्त विदयार्थी पुढीलप्रमाणे मुख्य गट – बाळकृष्ण पेडणेकर दुसरा, आयुष राठोड आठवा, भावेश कुडतरकर बारावा, विभव राऊळ तेरावा अनरेटेड गट – योगी लेले,दुसरा मुलींचा गट – क्षितीजा मुंबरकर,तिसरी नऊ वर्षांखालील गट – यश सावंत,पहीला मुक्ताई अॅकेडमीचे संचालक व प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी पारीतोषिके मिळवली.पारीतोषिकप्राप्त विदयार्थ्यांचे सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब बाळराजे,राणीसाहेब सत्वशीलादेवी आणि युवराज लखमराजे यांनी कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
