विशाल सावंत; उंची पाहून आमच्या तालुकाप्रमुखांवर टीका करा…
सावंतवाडी ता.२२-:* बंटी पुरोहित यांना राजस्थान मधून येथे येऊन जेवढी वर्ष झालीत तेवढी मत तरी त्यांना इथे मिळतील का? असा सवाल युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी उपस्थित केला असून, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात उगम पावणाऱ्या बंटी पुरोहित यांनी आपली उंची पाहून आमच्या तालुका प्रमुख्यांवर टीका करावी असा इशारा विशाल सावंत यांनी बंटी पुरोहित यांना यावेळी दिला आहे.
स्वतःचा पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उष्ट खरकडे समजत असल्यामुळेच संजू परब यांच्याकडे आता स्थानिक माणसे राहिली नसून, राजस्थानावरून येथे येऊन व्यवसाय करणाऱ्याची त्यांना मदत घ्यावी लागत आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत येथील सुसंस्कृत, शांत जनता निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उष्टी खरकडी म्हणणाऱ्यांना त्यांची जागा आणि पात्रता दाखवून देईल आणि तिन्ही निवडणुकांमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास देखील त्यानी यावेळी व्यक्त केला आहे.
