सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ कणकवली तालुकाध्यक्षपदी महानंदा चव्हाण

सचिवपदी विनायक चव्हाण तर खजिनदारपदी संजय चव्हाण यांची निवड

कणकवली ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली च्या तालुकाध्यक्षपदी महानंदा चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी अविनाश अनंत चव्हाण ( नविन कुर्ली वसाहत ), खजिनदार पदी संजय चव्हाण ( कासार्डे ) यांची निवड करण्यात आली. यावेळी चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, सचिव चंद्रसेन पाताडे,माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण, ऍड. अनिल निरवडेकर, कोषाध्यक्ष नामदेव जाधव, मावळते तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, आनंद जाधव, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सभागृहात पार पडली. तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या महेंद्र चव्हाण आणि महानंदा चव्हाण यांच्यात जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, चंद्रसेन पाताडे,नामदेव जाधव, विजय चव्हाण, ऍड. अनिल निरवडेकर यांनी समेट केल्यानंतर महेंद्र चव्हाण यांनी माघार घेतली. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील 3 वर्षांसाठी महानंदा चव्हाण यांची तालुकाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

महानंदा चव्हाण हे मागील 38 वर्षांपासून जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात कार्यरत आहेत. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता महानंदा चव्हाण हे सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे समाजबांधवांच्या सुखदुःखात सहभागी असतात. चर्मकार समाजातील शेकडो होतकरू गरजू आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक, शैक्षणिक वस्तूरुप मदत स्वतः केली आहे आणि आपल्या माध्यमातून मिळवून दिली आहे. महानंदा चव्हाण हे कणकवली कॉलेज कणकवली येथे नोकरी करत असून शुभकार्यात मान्यवरांना फेटे बांधण्याचाही व्यवसाय करतात. मूलतः समाजसेवेची आवड असल्यामुळे मला माझ्या समाजाने दिलेल्या संधीचा समाजहितासाठी पुरेपूर वापर करणार आहे. शासकीय योजनांचा लाभ समाजबांधवांना मिळवून देणार आहे असे नूतन तालुकाध्यक्ष निवडीनंतर महानंदा चव्हाण यांनी सांगितले. यावेळी कणकवली तालुक्यातील चर्मकार समाजातील शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page