त्रिकुट युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल…

सागरी किनारपट्टी सुरक्षेबाबत नौकेवरील अधिकाऱ्यांनी मच्छिमारांना केले मार्गदर्शन

देवगड ता.२२-:* भारतीय नौदलाची सागरी किनारपट्टीवर टेहाळणी करणारी त्रिकट युध्दनौका विजयदूर्ग बंदरात सोमवारी दाखल झाली .या वेळी स्थानिक नागिरक तसेच मच्छिमार यांनी त्याठिकाणी युद्धनौका पाहण्यासाठी गर्दी केली .

स्थानिक मच्छिमारांना त्या नौकेवरील नौदल अधिकारी यांनी स्थानिक मच्छिमार नागरिक याना सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

तसेच प्रमुख अधिकारी वर्गाने विजयदुर्ग किल्याला भेट देऊन पाहणी केली. ही नौका गोवा येथून मुंबई या मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना विजयदूर्ग जेटी येथे ही नौका दाखल झाली. विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री फारणे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासमवेत भेट देऊन बंदोबस्त ठेवला होता.युध्दनौका पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.सागरी सुरक्षेचा आढावा व स्थानिक मच्छिमार व शासकीय यंत्रणा समवेत सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा करून ही नौका मंगळवारी मुंबईकडे रवाना होणार आहे.

You cannot copy content of this page