मालवण ता.२१-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच मुलांना खाऊ व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, उपशहरप्रमुख बाळू नाटेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख आतू फर्नांडिस, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी आदी उपस्थित होते.
