अर्चना घारे परब यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला उत्सव
आंबोली -:चौकुळ नेनेवाडी येथे आज तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख अर्चना घारे परब या उपस्थित होत्या. यावेळी उपसरपंच संजना गावडे, शिवतेज मित्र मंडळ अध्यक्ष लक्ष्मण गावडे, विकास सोसायटी अध्यक्ष तुकाराम गावडे, अजित नातू आदी उपस्थित होते.
