कट्टा येथील शिबिरात ६५ जणांचे रक्तदान

मालवण (प्रतिनिधी) कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन विस्तार विभाग व आभाळमाया ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यानी दीप प्रज्वलनाने व डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, संचालक सुधीर वराडकर, तिरवडे सरपंच विहंग गावडे, शेखर जिल्हा पेणकर, हेमंत माळकर, राकेश डगरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश वाईरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. जमदाडे, संजय नाईक, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर, अॅड. प्रदीप मिठबावकर, समीर रावले आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. ऐश्वर्या शेळके तसेच किशोर नांदगावकर, प्रांजली परब उपस्थित होत्या. ५५ वेळा रक्तदान करणारे अवधूत इगरे यांचा साठविलकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन वैशाली पालव यांनी केले.

You cannot copy content of this page