मोटारसायकल रॅली काढत मनसेतर्फे शिवजयंती साजरी

मालवण ता.२१-:* ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, भगवे झेंडे फडकवीत पिंगुळी, कुडाळ ओरोस ते मालवण अशी मोटारसायकल रॅली काढून आज मनसे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतानाच मालवणातील किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. तिथीप्रमाणे येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनसेतर्फे शिवजन्मोत्सव म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त आज सकाळी पिंगुळी कुडाळ येथुन मोटारसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिजामाता चौक येथे जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कुडाळ शहर बाजारपेठेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून ओरोस येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर मालवण तालुक्यातील चौके मांडकुली येथील शिवरायांच्या पुतळ्यास व नंतर दुपारी २ वाजता कुंभारमाठ येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

यानंतर मालवण शहरातून मोटारसायकल रॅली काढल्यावर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते किल्ले सिंधुदुर्गवर दाखल झाले. यावेळी शिवराजेश्वर मंदिर परिसरात ढोल ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी मंदिरात शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच किल्ल्यातील भवानी माता मंदिर व महादेव मंदिरातही दर्शन घेण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री,तालुका अध्यक्ष विनोद सांडव,शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर,शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर,गुरु तोडणकर, विजय पेडणेकर, गणेश गावडे, अभिजित दळवी, राजेश परब, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, बाळा पावसकर, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, अविनाश अणावकर, सत्यविजय कविटकर, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, रामा सावंत,अनिल कसालकर, प्रमोद परब,आपा मांजरेकर, सर्वेश राणे, गौरव कुडाळकर, वैभव धुरी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page