ललित चव्हाण यांच्यातर्फे रुग्णालयास साफसफाईचे साहित्य भेट

मालवण ता.२१-:* भाजप युवा मोर्चा मालवण शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. यानिमित्त ललित चव्हाण यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले तसेच रुग्णालयाला साफसफाईचे साहित्य भेट दिले.

तसेच मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांसमवेत केक कापून ललित चव्हाण यांनी वाढदिवस साजरा केला. तसेच मुलांना खाऊ वाटप केले. यावेळी निनाद बादेकर, दुर्गेश गांवकर, मयू पारकर, निकीत वराडकर, पंकज गावडे, सर्वेश लुडबे, नयन मांजरेकर, शुभम लुडबे, संकेत कुलकर्णी, कल्पेश गावकर, विराज गावकर, अनिकेत गावकर, राजा मांजरेकर, निलेश लुडबे यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page