कणकवली ता.२१-:* ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, लेखक, स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे प्रणेते , सोनवडे-घोटगे घाट मार्ग लढयाचे अग्रणी नेते व जांभवडे पंचक्रोशीच्या विकासाचे शिल्पकार असे झुंजार नेतृत्व असलेल्या प्राचार्य महेंद्र नाटेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवार 22 मार्च रोजी कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सायं 4 वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जांभवडे पंचक्रोशी रहिवासी मित्रमंडळ कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र संघटना, कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन, सोशल मीडिया मित्र,माधुरी-महेंद्र प्रतिष्ठान तसेच सिंधुदुर्गातील सामाजिक, शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावतीने प्राचार्य महेंद्र नाटेकर यांना भावपूर्ण आदरांजली आणि शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त सिंधुदुर्गवासीयांच्यावतीने प्राचार्य महेंद्र नाटेकर यांना आदरांजली पाहण्यात येणार आहे. तरी या शोकसभेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
