कणकवली ता.२१-:* डामरे ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून व किशोर मोरजकर ट्रस्टच्या सहकार्याने महीलांसाठी शिवणकला प्रशिक्षण उद्घाटन महीला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झाले आहे.या प्रशिक्षणासाठी डामरे गावातील बहुसंख्य महीला व मुलींनी नोंदणी केली आहे.सदर प्रशिक्षण महीनाभर होणार आहे.
सदर प्रशिक्षण उद्घाटन सरपंच सौ.सुजाता जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फीत कापून करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच संतोष कानडे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर साटम , पोलिस पाटील विश्वास सावंत,तिवरे वाळवेवाडी मुख्याध्यापक स्नेहल सावंत, मुख्याध्यापक वळवी, माजी सरपंच बबलू सावंत,माजी उपसरपंच शैलेश कानडे, किशोर मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर,पूजा कानडे,विनिता सावंत, प्रणाली जाधव ,विजय सावंत,प्रिया नानचे, ग्रामसेवक पाटील, आरोग्य सेविका ठाकरे,सौ.पारकर, अंगणवाडी सेविका दर्शना साटम,आशा सेविका ममता गावकर, सीआरपी मानसी जाधव, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले आहे.
