मळगाव कुंभार्ली-तेलकाटावाडी येथे आरोग्य तपासणी

निरवडे आरोग्यकेंद्र व मळगाव उपकेंद्रांच्यावतीने एनसीडी कॅम्पअंतर्गत तपासणी

सावंतवाडी ता.२१-:* निरवडे प्राथमिक आरोग्यकेंद्र व मळगाव उपकेंद्रांच्यावतीने एनसीडी कॅम्पअंतर्गत मळगाव कुंभार्ली-तेलकाटावाडी येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीचा कुंभार्ली-तेलकाटावाडीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. यात हिमोग्लोबिन, रक्तदाब व मधुमेह आदी तपासणी करण्यात आली.

यावेळी आरोग्यसेविका एस. आर. पाटील, आरोग्यसेवक कुबल, सीएचओ मयुरी कलंबिस्तकर, आशा स्वयंसेविका सायली नाईक, मदतनीस मनीषा कातळकर, विजया गवंडे, नेहा नाटेकर, रागिणी शिरोडकर तसेच श्री देव दोन पूर्वस व दत्तकृपा समुहाच्या महिला व तेलकाटावाडीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्यसेविका एस. आर. पाटील यांनी तपासणीसाठी उपस्थित असलेल्यांना आरोग्याची काळजी घेण्याविषयक मार्गदर्शन केले. यावेळी एकूण २८ जणांची तपासणी करण्यात आली.

You cannot copy content of this page