रुपेश राऊळ यांनी उंची पाहून टीका करावी…

बंटी पुरोहित; रुपेश राऊळ निष्क्रिय तालुका प्रमुख

सावंतवाडी ता.२१-:* रुपेश राऊळ यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर बोलण्यापूर्वी पहिल्यांदा स्वतःचे पहावे. ते निष्क्रिय तालुका प्रमुख असल्याचे त्यांचेच काही कार्यकर्ते येऊन सांगत आहेत. असा जोरदार पलटवार भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष बंटी पुरोहित यांनी केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांनी जर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. तर तो निधी नक्की गेला कुठे? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. रुपेश राऊळ यांच्या घरी जाणार रस्ता देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मंत्री असताना झाला आहे. त्यानंतर त्या रस्त्याची डागडुजी देखील त्यांना अद्याप करता आली नाही. त्यामुळे त्यांनी आपली उंची पाहून संजू परब यांच्यावर बोलावे

You cannot copy content of this page