देवगड मनसे च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

देवगड ता.२१-: देवगड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव (तिथीप्रमाणे) देवगड येथे साजरी करण्यात आली . या निमित्ताने छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले.व अभिवादन केले.

या निमित्ताने उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले.या वेळी हर हर महादेव,छञपती शिवाजी महाराज की जय घोषणा देऊन जयजयकार करण्यात आला.

तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री,शिवप्रेमी मित्रमंडळ अध्यक्ष पपु कदम,सरचिटणीस जगदीश जाधव,उपाध्यक्ष महेश नलावडे,राजा मोंडकरविशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले ,विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर,शाखाध्यक्ष गणेश खोत,युवासेना शहर अध्यक्ष पपु जाधव,तुकाराम बांदेकर,गुरू देवगडकर धीरज वाडेकर,अरुण धुरी भिवा कोयंडे अन्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page