मडुरा येथील “त्या” पुलासाठी संजना सावंत यांनीच पाठपुरावा केला…

संजू परब;केसरकरांनी फुक्याचे श्रेय घेऊ नये

सावंतवाडी ता.१९-: मडूरा येथे होणाऱ्या पुलासाठी आपण स्वतः बांधकाम विभागात निवेदन दिले असून, हा पूल व्हावा यासाठी जिल्हा परिषदच्या संजना सावंत यांनी पाठपुरावा केला आहे. त्यांच्या माध्यमातूनच हे काम सुरू होणार असून, आमदार दीपक केसरकर यांनी उगाच श्रेय घेऊ नये असा पलटवार संजू परब यांनी केसरकर यांच्यावर केला आहे.

ते पुढे म्हणाले की, आमदार दीपक केसरकर हे जनतेची दिशाभूल करत असून , त्यांनी मडूरा गावावर लक्ष देण्यापेक्षा आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे.

You cannot copy content of this page