संजू परब यांचा टोला; उमेदवार नसल्यानेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न…
सावंतवाडी ता.१९-:* अधिकारी आपल्याला काहीच किंमत देत नाहीत असे स्वतः आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले असून, शिवसेनेत त्यांची जी किंमत आहे. तीच किंमत आज त्यांना अधिकारी देत असल्याचा टोला माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.
यावेळी त्यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन अधिकारी आपल्याला किंमत देत नसल्याचे कबूल केल्याने आपण तांचे आभार मानतो अशा शब्दात खिल्ली उडविली आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आगामी नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या कडे सक्षम असे वीस उमेदवार नसल्यानेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी करावी लागत असून, महाविकास आघाडी होण्यासाठी ते प्रयत्न करावे लागत असून, तालुक्यासह आता शहरात देखील त्यांची ताकद कमी होत चालली आहे. त्यामुळे जनतेने आता त्यांना नाकारून शहरातून देखील टाटा बायबाय करायला सुरुवात केली आहे. असा जोरदार टोला देखील त्यानी यावेळी लगावला आहे.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी नगरसेवक मनोज नाईक,बंटी पुरोहित,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
