गरजू महिलांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…
सावंतवाडी ता.१७-:* भाजप प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजप कडून शहर व तालुक्यातील २०० गरीब महिलांना माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवत माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, समृध्दी माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, अस्मिता परब, मिसबा शेख, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर, संतोष गावंस, विनोद सावंत, बंड्या कोरगावकर आदी उपस्थित होते.
