उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन…

सावंतवाडी ता.१७-:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्रीरोग तज्ञ डॉ दुर्भाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.हा रस्ता होण्यासाठी सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेने पाठपुरावा केला होता.

यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, ज्येष्ठ माजी नगरसेविका लोबो, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, प्रतिक बांदेकर, सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव, देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक संजय पेडणेकर सुनील नाईक सतीश बागवे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page