कोकणातील मुलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशाल परब विविध उपक्रम राबवतो…

निलेश राणे; वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत विशाल परब यांचे केले कौतुक…

कुडाळ ता.१६-: विशाल परब यांनी नेहमी मोठेच कार्यक्रम केले त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगळीच आहे. विशाल परब यांची ओळखी सिंधुदुर्गात सोडून द्या तर जेवढी निलेश राणे यांची ओळख नाही तेवढी विशाल परब यांची ओळख आहे अशा शब्दात निलेश राणे यांनी विशाल परब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे भरभरून कौतुक केले.

तर पैसे जास्त झाले म्हणून कोणीही कार्यक्रम घेत नसतो तर आपल्या कोकणातल्या मुलांना संधी उपलब्ध व्हावी आपला खेळाडू महाराष्ट्र लेवलवर खेळण्यासाठी तयार व्हावा यासाठी त्याचे हे आयोजन आहे या खेळाकडे खेळाडूंनी मौज मजेच्या दृष्टीने न पाहता काहीतरी शिकवून मिळेल अशा दृष्टिकोनातून पहा असे सांगितले.

You cannot copy content of this page