लाखो रुपयांचे माड बागायतीचे नुकसान
सावंतवाडी ता 16: कारिवडे कचरा डेपो पासून जवळपास 50 मी अंतरावरील रस्त्यालगत असलेल्या नाईक यांच्या बागायतीला आज भीषण आग लागली ही घटना साय सात वा सुमारास घडली यात नारळ बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले तरी या आगीमध्ये लाखो रुपयांचे माड बागायतीचे नुकसान झाले आहे कारीवडे सरपंच अपर्णा तळवणेकर यांनी घटनेची माहिती घेत तलाठी यांना नुकसान ग्रस्त भागाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले
