मतभेद विसरून निलेश राणे यांना विधानसभेवर पाठवू

भाजप युवा नेते विशाल परब : वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे कार्यक्रम

कुडाळ ता.१६-:* निलेश राणे आपले नेते असून, २०२४ साली ते विधानसभेत दिसले पाहिजेत. २०२४ चा काळ हा निलेश राणेंचाच असणार आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून,त्यांना विधान सभेवर पाठवण्यासाठी आपण सर्वच कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला सुरुवात करुया. निलेश राणे नक्कीच विधानसभा गाजवतील असा विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, मी आज जो कोणी आहे तो केवळ निलेश राणे यांच्यामुळेच, त्यांना मी ज्या ज्या वेळी कार्यक्रमाला बोलवले त्या त्या वेळी ते वेळ काढून माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. निलेश राणेच्या सहकार्याने आणि विशाल परब मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण येथे विविध प्रकल्प आणणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

You cannot copy content of this page