आमदार दीपक केसरकर यांच्यामुळेच पहिली बैठक रद्द; राजन तेली यांचा आरोप
सावंतवाडी ता.१५-: महाविकास आघाडी सरकारने कबुलायतदर गावकर यांच्यावर अन्याय केला असून, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या मुळे याबाबतची पहिली बैठक रद्द झाल्याचा आरोप राजन तेली यांनी येथे बोलताना केला आहे. आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. या आंदोलनातून तेथील ग्रामस्थांनी विविध मागण्या केल्या असून, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भेट देत पाठींबा दिला आहे.
यावेळी ते बोलताना म्हणाले की, हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी भाजपच्या काळात २०१८ साली बैठक झाली होती. परंतु, त्यानंतर काहीच दिवसात आचारसंहिता लागल्याने हा प्रश्न रखडून राहिला. त्यानंतर भाजपची सत्ता गेल्यानंतर आताचा सरकारने हा प्रश्न दोन वर्ष झाली तरी सोडवला नाही. असे देखील ते यावेळी म्हणाले. हा विषय विधिमंडळात मांडण्यात यावा असा आमचा उद्देश असून, हा विषय विधिमंडळात मांडण्यासाठी माझे विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सर्वांनी एकत्र रहा, तुम्ही सगळे तुमच्या हक्कासाठी भांडत आहात. तुम्ही मांडलेले विषय सर्व योग्य आहेत.
यावेळी पोलिसांनी लोकांना भडकवू नये. आंदोलन करणे, घोषणा देणे हा त्यांचा नैतिक अधिकार असून, आपण लोकशाहीत राहतो, त्यांना कोणीही रोखू शकत नाही. असा इशारा देखील राजन तेली यांनी यावेळी दिला आहे.
